जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला पाहायचंय |
ज्या शत्रूचा कुणी पराभव करू शकत नाहीय त्या शत्रूला मला हरवायचंय |
कुणालाही सहन होत नाही ते कुख मला सहन करायचंय |
ज्या ठिकाणी धाडसी माणसं जाण्याचं धाडस करत नाहीत त्या ठिकाणी जाऊन मला धावायचंय |
ज्या वेळी माझे बाहू थकलेत पाय थकलेत शरीर थकलय त्यावेळी मला समोर एव्हरेस्ट दिसतंय |
त्यावेळी मला माझं एक एक पाऊल त्या एव्हरेस्टच्या दिशेने टाकायचंय ।
तो आवाक्याबाहेर असणारा तारा मला गाठायचंय, तो किती दूर आहे, तो कोणत्या ठिकाणी आहे याची मला काहीच फिकीर नाही |
त्या ताऱ्याचा शोध मला घ्यायचाय |
मला सत्यासाठी झगडायचंय संघर्ष करायचंय |
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाहीय |
कुठलाही थांबा घ्यायचा नाहीय |
माझी नरकात जाण्याचीही तयारी आहे पण त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे।